🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती, परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं, या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असा सवालही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान अद्याप सरकार कडून यावर कोणीही बोलले नव्हते मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक संजय राठोड यांच्या बचावासाठी पुढे आले आहे. ‘या आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचं कोणीही नाव घेत नाही. कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईलच. भाजपच्या नेत्यांना खोटं बोलण्याची सवय आहे, हा त्यांचा धंदा आहे’. असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या लिलावात सगळ्यात वयस्कर खेळाडू ; ‘या’ स्टार क्रिकेटपटूचा आहे मुलगा
- ‘ख्रिश्चन, मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही’
- नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
- थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही – एकनाथ शिंदे
- लातुर जिल्हा महाराष्ट्र केसरी साठी सज्ज; ४५ मल्ल निवड चाचणीला हजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
