Share

‘ख्रिश्चन, मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही’

Published On: 

नवी दिल्ली : जे दलित व्यक्ती ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील, त्यांना कोणत्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली.

रविशंकर प्रसाद म्हणाले, “ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना एससी आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. याशिवाय त्यांना एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही.”

ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.संविधानाच्या परिच्छेद 3 मध्ये अनुसुचित जातींबाबत म्हटलं आहे की हिंदु, शीख किंवा बुद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसुचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदु धर्मात आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्याचे व्याप्ती वाढवून हिंदु, शिख आणि बुद्ध यांचाही समावेश करुन व्याप्ती वाढवण्यात आली,” असंही प्रसाद यांनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!