मुंबई – ‘ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा असे सांगतानाच ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.
ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे. नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला. हा संघर्ष सुरू असतानाच ट्विटरने नियमांवर बोट ठेवत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर संघ नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टीक काढून टाकली आणि पुन्हा सुरू केली. पण यानंतर केंद्राने ट्विटरला नोटीस पाठवत नियमांची अंमलबजावणी करण्याचा शेवटचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

