🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे त्यांचा प्रवेश झाला. शिवरायांच्या विचाराने भाजप काम करत आहे, त्यामुळे प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं उदयनराजे यांनी सांगितले आहे.
उदयनराजेंच्या या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ‘देशभरातील राजे-रजवाड्यांना संस्थानिक जमिनी विकण्याची परवानगी देण्याचं आमिष दाखवून भाजप त्यांना आपल्याकडे वळवत आहे. उदयनराजेही शिवकालीन संस्थानिक जमिनी विकून कोट्यवधी रूपये मिळवू इच्छितात. त्यासाठीचं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशी टीका मलिक यांनी केली आहे.
पुढे बोलताना मलिक यांनी १९९९च्या आधी उदयनराजे भाजपचे आमदार व मंत्री होते. राष्ट्रवादीनं त्यांना पराभूत केलं होत. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईंच्या मध्यस्थीमुळे शरद पवार त्यांना दरवेळी तिकिट देत असत. मात्र, पक्षात असूनही उदयनराजे नेहमी पक्षविरोधी भूमिका घेत. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा तर पराभव करीलच शिवाय साताऱ्यातल्या विधानसभेच्याही सर्व जागा जिंकेल असं विधान मलिक यांनी केले आहे.
दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला त्रास त्यांनी कधी सांगितला नाही असं विधान केले आहे. तसेच उदयनराजे यांनी संसदेत चांगले काम करावे असंही त्या म्हणाल्या.
- शिवसेनेने स्वतःचा संसार नीट चालतो का ते बघावे – नवाब मलिक
- भाजप शिवरायांच्या विचाराने काम करतेय, लोकांच्या हितासाठी भाजप प्रवेश करतोय – उदयनराजे
- ‘शिवाजी कर्डिलेंना उमेदवारी दिली तर पीडित नागरिक आत्मदहन करतील’
- ‘माझं नाव उदयनराजे आहे, जे करायचं ते सांगून करतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
