🕒 1 min read
मुंबई : रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी(२६ डिसें.) या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’देशात मोदी सरकार आल्यापासूनच गोडसेचा गौरव सुरू झाला आहे. आता मर्यादा ओलांडून महात्मा गांधींना बदनाम करण्याचे काम सुरू आहे.’, असे मलिक म्हणाले आहेत. तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून भोंदू महाराज असलेल्या कालीचरणला अटक करावी, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
गोडसे का महिमामंडन देश में जब से मोदी सरकार आयी तब से शुरू हो गया। अब मर्यादा लांघकर महात्मा गांधीजी को बदनाम करने का काम चल रहा है। हम मांग करते है की देशद्रोह का मुकदमा दर्ज हो और कालीचरण, जो फर्जी महाराज है उसकी गिरफ्तारी हो। pic.twitter.com/VtI4zvTDmi
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 27, 2021
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर कालीचरण महाराज यांच्यावर रविवारी सायंकाळी आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर; छगन भुजबळांची माहिती
- ‘…त्यामुळे अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब’, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

