Share

सत्तेची चटक लागल्यानेचं भास्कर जाधव शिवसेनेत गेले – नवाब मलिक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री या निवासस्थानी जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादी कॉंग्रेसला कोकणात मोठा धक्का बसला आहे.

यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. त्यांनी सत्तेची चटक लागल्यानेच भास्कर जाधव शिवसेनेत गेले आहेत परंतु त्यांचा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव करून याचा बदला घेईल असं विधान करत भास्कर जाधव यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

पुढे बोलताना त्यांनी भास्कर जाधव हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. ते शिवसेनेत असताना त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला होता. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. विधानसभा देण्यात आली. मंत्री करण्यात आले. परंतु आता ते सत्तेसाठी शिवसेनेत गेले आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांच्यासमोर दमदार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस देईल आणि त्यांचा पराभव करेल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादी गुहागरमधून कोणाला उमेदवारी देईल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!