मुंबई : केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याबाबत पवारसाहेबांनी सल्ला दिलेला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र काही माध्यमातून उलटसुलट बातम्या करुन लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
‘केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांना महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचा विरोध आहे. हा विरोध कालही होता, आज आणि उद्याही कायम राहील. विधानसभेमध्ये या कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पारित करण्याचे काम सरकारकडून होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारतर्फे समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करुन शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करेल. अभ्यासाअंती आपला अहवाल सरकारला देईल. या अहवालातील मसुदा शेतकऱ्यांना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही.
या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारतर्फे समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करुन शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करेल. अभ्यासाअंती आपला अहवाल सरकारला देईल. या अहवालातील मसुदा शेतकऱ्यांना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही – @nawabmalikncp
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 3, 2021
तसेच माननीय पवार साहेबांनी तीन कृषी कायद्यांच्या बाबतीत केंद्र सरकारला कोणताही सल्ला दिलेला नाही. मात्र काही माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्यात आली. तीनही कृषी कायदे रद्द व्हावेत, ही पक्षाची सुरुवातीपासूनची स्पष्ट भूमिका आहे.’ असे मत देखील त्यांनी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांनो काळजी घ्या ; शहरात आज नव्याने ३४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- महाराष्ट्रात राजकीय भूकंप ? ; संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त भेट
- पडळकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवणारे पोलीस प्रणिती शिंदेंवर कारवाई करणार का ?
- संजय राऊत-आशिष शेलार यांच्यात गुप्त बैठक, प्रविण दरेकर म्हणाले…
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

