मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा कारवाई दरम्यान अटकेत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या सर्व प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा करुन वेगळं वळण लागलं किंवा लावलं गेलं.
या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ‘नवाबच्या नादाला लागून काकाचे घोटाळे बाजूला राहणार नाहीत याची काळजी घ्या. काकाच्या घोटाळ्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी काकाने सोडलेलं पिल्लू म्हणजे नवाब’, असं सदाभाऊ म्हणाले आहेत.
नवाब च्या नादाला लागून काकाचे घोटाळे बाजूला राहणार नाहित याची काळजी घ्या..
काकाच्या घोटाल्यावरुन जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी काका ने सोडलेले पिल्लु म्हणजे नवाब..
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 27, 2021
दरम्यान, नवाब मलिकांनी समीर वानखेडे प्रकरण एवढं उचलून धरलं आहे की, समीर वानखेडे यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे मलिकांनी सोशल मीडियावर शेअर केली आणि वानखेडेंच्या जातीवर प्रश्नचिन्हा उपस्थित केलं आहे. यावरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप
- तेजस्विनीच्या बोल्ड फोटोवर ‘खल्लास…’म्हणत चाहत्यांनी दिली पसंती
- मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले
- राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मानहानीचा गुन्हा दाखल केल्यानंतर शर्लिनने दिले प्रत्युत्तर


