Share

ते राहुल गांधींचं मत, मी माफी का मागू ? ; गांधींच्या नाराजीवर कमलनाथांचं प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली.

दरम्यान, यानंतर चूक मान्य करण्याऐवजी तो एक सामान्य शब्द आहे असं म्हणत आपल्या चुकीचं समर्थन केलं होतं. इमरती देवी यांना या अपमानजनक वक्तव्यानंतर रडू कोसळलं होतं. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने मध्यप्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी केलेल्या अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्याची निंदा केली आहे.

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी देखील कमलनाथांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना झापलं आहे. राहुल गांधींच्या प्रतिक्रियेनंतर कमलनाथांनी देखील उत्तर दिलं आहे. ”ते राहुल गांधींचं मत, मी ज्या संदर्भात हे विधान केले आहे त्या संदर्भात मी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नसताना मी माफी का मागावी? कुणाला जर अपमान वाटला असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे’ असं कमलनाथ म्हणाले आहेत. त्यामुळे आता दोन्ही दिग्गज काँग्रेस नेतेच याप्रकरणामुळे सामोरे आल्याचं दिसून आलं आहे.

राहुल गांधींनी कमलनाथांना झापलं –

‘कमलनाथ माझ्या पक्षातील नेते आहेत, पण व्यक्तिशः त्यांनी वापरलेली भाषा मला आवडली नाही. ते कोण आहेत याची पर्वा न करता माझं समर्थन नाही. ते दुर्दैवी आहे’ अशा शब्दांत त्यांनी कमळनाथांची कानउघडणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!