🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नुकताच दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्रात विखे यांनी श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना लक्ष्य केले आहे.
पाचपुते यांना तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी माझ्या सर्व गुडविल्स वापरल्या. पण ऐनवेळी त्यांनी फसवले. विश्वासाला तडा गेला, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी पाचपुते यांच्याबद्दल आपल्या भावना आत्मचरित्रात व्यक्त केल्या आहेत.
देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचे दिवंगत विखे पाटील यांनी म्हटले आहे की, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण या मतदारसंघात माझा काँग्रेसच्या यशवंतराव गडाख यांच्याकडून पराभव झाला. काॅंग्रेस पक्षाची मला उमेदवारी मिळाली नव्हती. या निवडणुकीत गडाख विजयी झाले.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि गडाख यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून मी उच्च न्यायालयात गेलो. तेथे त्यांची तक्रार ग्राह्य धऱून गडाख यांची निवड रद्द करण्यात आली. विखे पाटील निवडणुकीत पडले, ही कल्पना लोकांना असह्य होती.
गडाखांची निवड रद्द झाल्यानंतर मला निवडणुकीला उभे राहा, असा जिल्ह्यातून आणि राज्यातूनही आग्रह सुरू झाला. परंतु ज्यांच्यावर माझा भरवसा होता तो नेवासा विधानसभा मतदारसंघ तुकाराम गडाखांंचा आणि श्रीगोंदा बबनराव पाचपुतेंचा हे दोघंही नेते बरोबर प्रचाराला हिंडले. पण नेमके याच दोन मतदारसंघात कुठे माशी शिंकली माहीत नाही. पण मला इथेच मते कमी पडली.
मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या मंत्रीमंडळात बबनरावांना मंत्री करण्यासाठी मी शब्द टाकावा, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी मी माझ्या सगळ्या `गुडविल्स` वापरल्या. परंतु ज्यांना मी मदत केली, त्यांनीच धोका दिला. वरील दोन्ही व्यक्तींनी माझ्याशी दगाफटका केला, तरीही मी त्यांना दूर केले नाही. नंतरही तुकाराम गडाख खासदारकीला उभे राहिले. तेव्हाही मी त्यांना मदतच केली, असे विखेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
- राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी- अनिल बोंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
