🕒 1 min read
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येईल का, याचा अभ्यास खासदार संभाजीराजे यांनी करु नये, ते नापास होतील, असा खोचक टोला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लगावला आहे. मराठ्यांचं ओबीसीकरण करु नये या मागणीसाठी ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
तर, 10 नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी नेत्यांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. इतकच नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाला घेराव घालण्याचा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.
राज्य सरकारनं ‘सारथी’ संस्थेला स्वायत्त दर्जा दिला. त्याप्रमाणेत ‘महाज्योती’ या संस्थेलाही स्वायत्तता द्या, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल ही हरीभाऊ राठोड यांची वैयक्तिक भूमिका आहे. या भूमिकेशी ओबीसी समाज सहमत नसल्याचं शेंडगे यांनी सांगितलं. तसंच राठोड यांच्या भूमिकेवरही त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- महाराष्ट्राला मदत करण्यास केंद्राचा दुजाभाव : राजू शेट्टी
- राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी- अनिल बोंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
