अमरावती : अमरावती जिल्ह्यातील गांधी नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोरदार राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. आपला फोन रेकॉर्ड कसा केला, या मुद्यावरून नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली.
अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांधी नगर येथील एका हिंदू 19 वर्षे तरुणीचे अपहरण केले. मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले आहे. मात्र, अजूनही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आक्रमक होत पोलीस ठाण्यात दाखल झाले. मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच भडकल्या, मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला असा आरोप करत ठाणेदार मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला. त्यावेळी पोलीस व नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. आमच्याकडे असे काही विषय येत असले आणि जर आम्ही तुम्हाला फोन करत असताना फोन रेकॉर्ड होत असेल. मी तुम्हाला सांगते. मी फोन केला तेव्हा माझा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी पोलिसांना धारेवर धरलं.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | पेंग्विनसेना मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहतोय; भाजपचा सेनेला टोला
- Navneet Rana | पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला – नवनीत राणा
- Chandrasekhar Bawankule | “…अन् 5 कोटी मिळवा”; चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ऑफरच दिली
- Chandrashekhar Bawankule | मजबुत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील – चंद्रशेखर बावनकुळे
- BJP-MANSE | भाजप मनसे युती होणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

