Share

पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढला, ‘हे’ निर्बंध राहणार कायम; अजित पवारांच्या सूचना

Published On: 

पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.

तर, पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली पुणे शहरातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही २०० पर्यंत आली होती. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा पुणे शहराच्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ टक्के इतका होता आता हा रेट ५.३ एवढा झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. जिल्हा आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे. तसेच, मॉल सुरु करण्याबाबत विचार विनिमय झाला मात्र सेंट्रल एसीमुळे संसर्गाची भीती अधिक असल्याने सध्या मॉल हे बंदच राहणार आहेत. तर, लसीकरण झालं असेल तर 18 वर्षापुढील खेळाडूंना इनडोर गेमला परवानगी देत असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?

  • पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
  • मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने. ४ वाजेनंतर आणि शनिवार-रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा
  • खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने
  • उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!