🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या देशात कोरोनाचे संकट असल्याने अनेक बँकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातच अनेक बँक आपल्या ग्रांह्कांसाठी विविध योजना उपलब्ध करत आहेत. यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळा अर्थात LICने १ जुलै २०२१ पासून सरल पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज घेता येते. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही वर उपलब्ध आहे.
LIC सरल पेन्शन योजना एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक त्वरित एन्युइटी योजना आहे. ही योजना पती-पत्नीसमवेतही घेता येईल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही एक मानक त्वरित एन्युइटी योजना आहे, जी सर्व जीवन विमाधारकांना समान अटी देते.
योजना कशी खरेदी करावी
- LIC ची नवीन सरल पेन्शन योजना ऑफलाइन किंवा http://www.licindia.in वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करता येऊ शकते.
- योजनेअंतर्गतमिनिमम अॅन्युइटी १२ हजार रुपये प्रति वर्ष आहे.
- किमान खरेदी किंमत एन्युइटी मोड, पर्याय निवडलेल्या आणि पॉलिसी घेणार्याचे वय यावर अवलंबून असते.
- ही योजना ४० ते ८० वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
- मासिक पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा १ हजार रुपये जमा करावे लागतील.
पॉलिसीधारकाला सिंगल प्रीमियम पेमेंटवर दोन पर्यायांपैकी अॅन्युइटी निवडण्याचा पर्याय
- पॉलिसी होल्डरला आयुष्यभर पेन्शन मिळेल आणि त्याचा मृत्यू झाल्यात 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला देण्यात येईल.
- पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जोडीदार, पती किंवा पत्नी यांना आयुष्यभर पेन्शन मिळेल. लास्ट सरव्हायवरच्या मृत्यूनंतर 100 टक्के सम अश्योर्ड नॉमिनीला देण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पदोन्नती आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला निर्णय घेणे अशक्य’
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

