मुंबई:- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जनता, नोकरदार वर्ग, छोटे मोठे व्यापारी यांची आर्थिक गणितं बिघडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय फारसा योग्य नाही. आर्थिक समस्या उद्भवल्यामुळे हे सरकार स्वत: तर भिकारी आहेच आणि आता जनतेलाही भिकारी बनवण्याचे चाळे या सरकारकडून सुरू आहेत, अशी जळजळीत टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
सेलिब्रिटीच्या नाईट पार्टीमध्ये कोरोना जात नाही का? रेसकोर्सवर होणाऱ्या पार्ट्यांना कोरोना जात नाही का? मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्र्यांना दिलेल्या पार्टीत कोरोना येऊ शकत नव्हता का? माणसं पाहून कोरोना फिरतो का? सेलिब्रिटींना सारं काही माफ आणि नियम केवळ जनतेसाठी असा या सरकारची भूमिका आहे का? कोरोना संदर्भातील दुसरा म्युटेड व्हायरस ब्रिटनमध्ये सापडला म्हणून संचारबंदी केली. असेच भविष्यात तिसरे चौथे व्हायरस सापडू शकतील म्हणून काय जनतेला कायम लॉकडाउनमध्ये ठेवणार का?, असा रोखठोक सवाल देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात?’
- रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका, तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त
- कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय
- गौतम गंभीर यांच्या ‘जन रसोई’त मिळणार १ रुपयात पोटभर जेवण
- मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याच्या निर्णयावरून श्वेता महालेंची राज्य सरकार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

