अमेरिका : रशिया युक्रेन युद्धाच्या आज १७वा दिवस आहे. अजूनही रशियाकडून युक्रेन होणारे हल्ले काही थांबत नाहीयेत. कधी बॉम्ब हल्ले तर कधी रॉकेट हल्ले सुरूच आहेत. याचा परिणाम युक्रेनियन नागरिकांवर तर होतच आहे परंतु संपूर्ण जगावरही याचे परिणाम होत आहे. या युद्धामध्ये रशियाने अनेक निर्बंध धाब्यावर बसवले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी रशियाला एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असेही बायडन म्हणाले आहेत. आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. परंतु नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसरे महायुद्ध होईल, असा इशाराही बायडन यांनी दिला आहे.
शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जो बायडन यांनी सांगितले की आम्ही युरोपातील आमच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देतच राहणार आहोत. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नाटो क्षेत्राच्या इंच अन इंच भागाचे रक्षण करू आणि तसेच नाटोमधल्या अन्य देशांनाही यासाठी प्रेरित करू. मात्र नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसरे महायुद्ध होईल. पण आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करू. तसेच युक्रेनसोबतच्या लढाईत रशिया कधीच जिंकणार नाही, कारण आता जग पुतिन यांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे, असेही बायडन म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
