Share

महागाईचा निषेध करत पुण्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसने घातले गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – मोदी सरकारने जनतेला महागाईपासून मुक्तीचे… अच्छे दिन येणार हे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढवले की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गॅस सिलेंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदवण्यात आला.

देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्रसरकारच्यावतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे.पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्रसरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्रसरकारचा, व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणीई वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव व महिला पदाधिकारी उपस्थिती होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!