नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज हजारो नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत. अशात केंद्र सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. संकटकाळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत राहिले. तर कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही केली आहे.
दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आता केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच कोरोनाची दुसरी लाट वाढण्याचे जबाबदार धरले आहे. ‘पंतप्रधान मोदी हेच सुपर स्प्रेडर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट पसरण्यास तेच जबाबदार आहे. त्यांनी विधानसभेच्य निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये बेजबाबदारपणे प्रचार सभा घेतल्या. तसेच अशा संकटकाळात कुंभमेळा घेण्यासही परवानगी दिली, असा घणाघात डॅा. नवज्योत दहिया यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना डॉ. दहिया यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
एकीकडे आरोग्य क्षेत्रातील सर्वजण लोकांना कोरोनाचे नियम समजवून सांगण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी सगळे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रचारसभा घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. देशात अनेक जणांचा मृत्यू ऑक्सिजन तुटवड्यामुळे होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या परवानगी अभावी अनेक ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी रखडली आहे. पण सरकारकडून त्याला फारसे महत्व देण्यात आले नाही, अशी खंत दहिया यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
- …अन्यथा भावी पिढी माफ करणार नाही, प्रियांका गांधींचे योगी सरकारवर टीकास्त्र
- सामनावीर एबी डिव्हिलीयर्सची आणखी एका विक्रमाला गवसणी; ‘हा’ विक्रम करणारा केवळ दुसराच खेळाडू
- कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकुड पुरवठा
- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
