Share

बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना

Published On: 

मुंबई : नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दक्षिणेत यशस्वी चित्रपट दिल्यानंतर बॉलीवूडमध्ये नशिब आजमावणार आहे. बॉलीवूडमध्ये रश्मिकाला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. रश्मिका आणि बीग-बी ‘गुडबॉय’ या चित्रपटात एकत्र दिसतील अशी माहिती समोर येत आहे.

नुकतीच बीग बी अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर होणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती त्यांनीच सोशल मीडीयाद्वारे त्यांच्या चाहत्यांना दिली. यादरम्यान त्यांचा आगामी चित्रपट ‘चेहरे’चे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे त्यांचा नविन चित्रपट ‘गुडबॉय’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदना दिसणार आहे. येत्या ५ किंवा ६ एप्रिलला त्यांच्या चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे.

या चित्रपटातील मुख्य भाग हा चंदिगडमध्ये चित्रीत होणार आहे. तसेच चित्रीकरणासाठी काही भाग मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सेट बनवण्यात आला आहे. सुमारे एक महिना हे चित्रीकरण चालेल. तर पुढिल चित्रीकरण चंदिगड आणि हरिद्वार येथे होईल. या चित्रपटाची निर्मीती एकता कपुर आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!