Share

‘या’ दोन चित्रपटांसाठी बॉलिवूड क्वीन कंगना रानौतला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर !

Published On: 

दिल्ली : भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. दरम्यान, गेल्या वर्षभरात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहिलेल्या बॉलिवूड क्वीन कंगना रानौतला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मणिकर्णिका व पंगा या दोन चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळणार आहे. दरम्यान, याआधी २०१४ मध्ये क्वीन, तर २०१५ साली तन्नू वेड्स मन्नू या चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर तिने मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. यामुळे, शिवसेना आणि तिच्यामध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला होता. सध्या सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणावर देखील भाष्य करत तिने महविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी –

बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल

सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)

सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष  (असूरन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रानौत (पंगा, मणिकर्णिका)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!