Share

महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार

Published On: 

वेबटीम : महाराष्ट्रातील २५ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या यादीत १७ प्राथमिक, आठ माध्यमिक आणि दोन शिक्षक विशेष श्रेणीचे आहेत. पदक, प्रमाणपत्र आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी

प्राथमिक शिक्षक :

नागोराव तायडे (महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. २, घाटकोपर), उज्ज्वला नांदखिले (जिप प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता. हवेली पुणे), शोभा माने (जिप प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगांव, जि. सांगली), तृप्ती हतिसकर (महापालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी), सुरेश शिंगणे (जिप उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव चिलमखा, पो. उंबरखेड, जि. बुलडाणा), संजीव बागूल (जिप प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे, ता. मुळशी, पुणे), राजेशकुमार फाटे (जिप प्राथमिक शाळा, डोंगरगाव, जि. भंडारा), ज्योती बेलावळे (जिप प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी), अर्जुन ताकटे (जिप प्राथमिक शाळा, अहेरगाव, जि. नाशिक), रुख्मिणी कोळेकर (जिप प्राथमिक शाळा, वांगी-२, जि. सोलापूर), रामकिशन सुरवसे (जिप प्राथमिक शाळा, नागोबावाडी, जि. लातूर), प्रदीप शिंदे (जिप प्राथमिक शाळा, शिलापूर, नाशिक), अमीन चव्हाण (जिप उच्च प्रा. शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, जि. यवतमाळ), ऊर्मिला भोसले (जिप प्रा. शाळा, महालदारपुरी, जि. उस्मानाबाद), गोपाल सूर्यवंशी (जिप प्रा. शाळा, गंजुरवाडी, लातूर)’

माध्यमिक :

नंदा राऊत (मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, बीड), स्मिता करंदीकर (अहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळा, शनिवार पेठ, पुणे), नंदकुमार सागर (मुख्याध्यापक – जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, जेजुरी, जि. पुणे), शर्मिला पाटील (अंबिका विद्यालय, केडगाव, जि. नगर), सुनील पंडित (मुख्याध्यापक- प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीपेठ, नगर), कमलाकर राऊत (योगेश्वरी नूतन विद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई), संजय नारलवार (मुख्याध्यापक- प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. जि. गडचिरोली)

विशेष श्रेणी :

अर्चना दळवी (जिप प्राथमिक शाळा, बाहुली, ता. हवेली, पुणे), सुरेश धारव (जिप प्राथमिक शाळा क्रमांक २, निफाड), डॉ. मीनल सांगोळे (मूक-बधिर शाळा, शंकरनगर, नागपूर)

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!