Share

‘तानाजी मालुसरेंचा अवमान करणाऱ्या सरनाईकांचा बाळासाहेबांनीच कडेलोट केला असता’

Published On: 

मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर अनेक दिवस ईडीला चकवा देणारे सरनाईक ईडीच्या चौकशीसाठी हजर झाले होते.

ईडीच्या समोर हजर होण्याआधी मागच्या मंगळवारी सरनाईक मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. यांनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नरवीर तानाजी मालुसरेंची तुलना स्वतःशी केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देखील सरनाईकांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले होते सरनाईक?

‘ज्या-ज्या वेळी ईडीचे अधिकारी चौकशीला बोलावतील त्या वेळी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. धाड सत्र सुरु झाल्यापासून दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झाला आहे. तो तानाजी सोळाव्या शतकातला होता. हा २१ शतकातला आहे. रयतेचं रक्षण करताना तो बिचारा धारातीर्थी पडला. मात्र, मी प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यास सक्षम आहे.’ अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर हिंदवी स्वराज्य निर्माणात मोलाचा वाट असलेल्या तानाजी मालुसरेंच्या अपमान झाल्याने शिवभक्तांसह अनेक नेत्यांनी देखील निषेध केला होता.

दरम्यान, हिंदवी स्वराज स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्यासाठी प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत तुलना करत तानाजी मालुसरे यांची बदनामी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यानी केली आहे.

नरवीर तानाजी मालुसरे हे योद्धे होते, निधड्या छातीने स्वराजाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढले, त्यांचे बलिदान हे या मातीला प्रेरणा देणारे आहे. मात्र आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली तुलना नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत करतानाच त्यांचा अपमान केला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकही असे नव्हते, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच सरनाईकांचा कडेलोट केला असता.

तानाजी मालुसरे व्हायला धमन्यांमध्ये हिंदवी स्वराज्य रक्षणाचे रक्त सळसळले पाहिजे, तानाजी मालुसरे काही या भारतात राहून पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणारे नव्हते. घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये. ते शूरवीर योद्धे होते त्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असेही भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!