🕒 1 min read
नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेंगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागांतून भारत आणि चिनने आपले सैन्य मागे घेतल्यानंतर राजकारण तापले आहे. या डिसएंगेजमेन्ट वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर संरक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राहुल गांधींवर पलटवार करत निशाना साधला. यातच, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा डिसएंगेजमेन्टवरून केंद्र सरकारला तीन प्रश्न करत उत्तर मागितले आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मोदी सरकारला भारत-चीन मुद्द्यावर घेरण्यासाठी तीन प्रश विचारले आहे ते खालीलप्रमाणे :-
१. आपल्या जवानांना कैलास रेन्जमधील स्ट्राँग पॉझिशनवरून माघारी का बोलावले जात आहे?
२. आपण आपला भू-भाग का देत आहोत आणि जवानांना फिंगर ४ वरून फिंगर ४ वर का आणत आहोत?
३. चीनने देपसांग प्लेन्स आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सवरून सैनिकांना मागे का बोलावले नाही?
एलएसीवरील डिसएंगेजमेन्ट संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी जबरदस्त पलटवार केला. नड्डा म्हणाले, या डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेत सरकारकडून भारतीय जमीन देण्यात आलेली नाही. एवढेच नाही, तर त्यांनी एक व्हिडिओ डॉक्यूमेंट्री ट्विट करत, “जर कुणी हजारो वर्ग किलेमिटर जमीन सोडण्याचे पाप केले असेल तर, तो एका भ्रष्ट, भ्याड वंश आहे, ज्याने देशातील आपली शक्ती कायम ठेवण्यासाठी तोडला,” असे म्हटले आहे.
GOI must explain-
1. Why our forces are withdrawing from dominant positions in Kailash Ranges?
2. Why we are ceding our territory & withdrawing from forward base at Finger 4 to Finger 3?
3. Why has China not withdrawn from our territory in Depsang Plains & Gogra Hot Springs?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 12, 2021
महत्वाच्या बातम्या
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
