अंबाला : फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली होती. जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे.प्रशिक्षित टीम अंबालामध्ये विमानांचा ताबा घेणार आहे. तर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही विमाने सुरक्षित लँड झाल्याची माहिती ट्विट द्वारे दिली आहे.
ही पाच विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून अखेर भारतात दाखल झाले आहेत. अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. ‘The Birds have landed safely in Ambala’, असं ट्वीट करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली. शिवाय राफेलच्या लॅण्डिंगचा व्हिडीओ देखील राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं आहे.
राष्ट्ररक्षासमं पुण्यं,
राष्ट्ररक्षासमं व्रतम्,
राष्ट्ररक्षासमं यज्ञो,
दृष्टो नैव च नैव च।।
नभः स्पृशं दीप्तम्…
स्वागतम्! #RafaleInIndia pic.twitter.com/lSrNoJYqZO— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2020
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राफेलच्या विमानांचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत राफेल विमानांचे स्वागत केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।। नभः स्पृशं दीप्तम् स्वागतम्!’
‘त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!’ रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
‘राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनची चिंता वाढेल असं वाटत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

