Share

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मिडिया सोडणार नाहीत…

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण येत्या रविवारपासून समाज माध्यम अर्थात सोशल मिडिया वरून आपले सर्व अकाऊंट वापरणं सोडून देण्याबद्दल विचार करत असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होत. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण आता पंतप्रधान मोदी सोशल मिडिया सोडणार नसल्याच स्पष्ट झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालवण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.

‘यंदाच्या महिला दिनी, ज्या महिलांचे जीवन आणि कार्य आम्हाला प्रेरणा देते अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया अकाऊंट चावण्यासाठी देणार आहे. यामुळे त्यांना लाखो लोकांना प्रेरणा देण्यास मदत होईल. तुम्हीही अशा प्रेरणादाई आहात किंवा तुमच्या ओळखीत अशा कोणी प्रेरणादाई महिला असेल तर त्यांच्या स्टोरीज #SheInspiresUs.ने शेअर करा’ असं मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!