टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान उद्या पार पडणार आहे, तत्पूर्वी आता राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याच्या चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी देखील राज्यातील लोकसभा निकालावर भविष्यवाणी केली आहे.
नारायण राणे यांच्या मतानुसार महाराष्ट्रातील ४८ जागापैकी भाजप १२ तर शिवसेना ९ – १० जागांवर विजयी होईल, तर आघाडीला चांगले दिवस येण्याची शक्यता राणे यांनी वर्तवली आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीला प्रत्येकी ९ – ९ जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आपले पुत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे ६० हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

