Share

नारायण राणेंनी सांगितले विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्याचे नेमके कारण

Published On: 

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ठाकरे सरकार कमी पडत आहे. याच करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे २२ जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आले. हे अधिवेशन ३ ऑगस्टरपासून सुरू होईल पण परिस्थिती गंभीर असल्यास फक्त एक दिवसाचेच कामकाज केले जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने हे अधिवेशन १४ मार्चला गुंडाळण्यात आले होते. सध्या करोना संकट वाढले असून २२ तारखेपासून अधिवेशन होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर अधिवेशन दीड महिने पुढे ढकलण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

यातच आता चक्रीवादळानंतर रायगडचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींची मदत जाहीर केली होती. तसेच रत्नागिरीसाठी ७५ कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी २५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली होती. नुकसानीच्या तुलनेत मदत तुटपुंजी असल्याने ती वाढवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

नेमका हाच मुद्दा राज्य सरकारसाठी अडचणीचा ठरत आहे. विरोधी पक्षाला सामोरं जायची ताकद सत्तारुढ पक्षामध्ये नाही त्यामुळेच अधिवेशन पुढे ढकललं जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करुन घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवासाचं अधिवेशन बोलावायला हवं, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. विरोधी पक्षाला सामोरं जायला जी ताकद लागते, ती सत्तारुढ पक्षामध्ये नसल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली.

आज राणे यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त फेरफटका मारुन होत नाही, राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी राणे यांनी केली आहे. सरकारची आर्थिक स्थिती कठीण आहे समजू शकतो. पण नैसर्गिक आपत्ती असल्याने तिजोरी कशीही असली तरी मदत केली पाहिजे,” असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

‘निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी’ अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

‘सिंधुदुर्गाला 25 कोटीची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही’ असा प्रहारही राणेंनी केला. केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील निरव मोदी; नितेश राणे यांची कणखर टीका

सिंधुदुर्गात ‘मुख्यमंत्री’ नव्हे ; ‘पर्यटक’ आले होते : खासदार नारायण राणे

‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी ‘हा’ निर्णय घेणं हे काही नवल नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!