टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, तसेच सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असा टोला लगावत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते.
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी येथील जत्रेस जात भराडीदेवीचे दर्शन घेतले. तसेच कोकणातील विकासकामांचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांसाठी कुठलाही निधी देण्याची घोषणा केलेली नाही. सी वर्ल्ड प्रकल्पाला एकेकाळी शिवसेनेने विरोध केला होता. मात्र आता त्या प्रकल्पाची बांधणी खासगी गुंतवणुकीतून करण्याची तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणाबाबत माहिती घेतली पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामाबाबत राज्य सरकार कमी पडत आहे. त्यांच्या आजच्या कोकण दौऱ्यातून कोकणाला काय मिळाले हा प्रश्नच आहे. सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असे नारायण राणे म्हणाले. तसेच खासदार म्हणून मुख्यमंत्र्यांना मदत करण्यास कधीही तयार असल्याचेही राणेंनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा कार्यभार पेलवत नाही. त्यामुळे तेच स्वतःहून पदाचा त्याग करतील. आणि मध्यावधी निवडणुका होतील. कारण मुख्यमंत्र्यांना पदावर राहायच नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी सांगायला नको. यापूर्वीही मारामारी केली आहे. सत्तेसाठी लाचारी केली हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही,असंही राणे यांनी म्हटले आहे.
एस.टी. कामगार अधिवेशन सोहळ्याला पवारांची उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
