🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करत, सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.
परीक्षा न देता जो माणूस मुख्यमंत्री झाला त्या माणसाने हा निर्णय घेणं काही नवल नाही. https://t.co/LeZeb1wrXN
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 1, 2020
जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. दरम्यान,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले, मुख्यमंत्र्यानी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या गुणांवर आधारित सरासरी गुण देउन पास केले जाईल तसेच ज्यांना ग्रेड मध्ये सुधारणा करायची आहे अश्यांना आगामी सत्रात परीक्षा देता येईल असा निर्णय घोषित केला अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
बेगडे म्हणाले, विद्यापीठ कायदा 2016 नुसार हा निर्णय जाहीर करण्याचा मुख्यमंत्र्याना अधिकार आहे का ? हा निर्णय विद्यापीठ कायद्या नुसार न टिकणारा आहे तसेच एकाच परीक्षेसाठी दुहेरी मापदंड का ? शासनाने घेतलेला हा निर्णय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुर्दैवी असून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या निर्णयाचा विरोध करत आहे.
मी स्वत: सभ्य आहे, याबाबतीत फक्त स्वत:चीच गॅरंटी घेऊ शकतो, पवार-राणे वादावर विखेंचा टोला
मुख्यमंत्री म्हणतात… कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या
‘पीयूष गोयलजी, घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
