मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी सवांद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही महाराष्ट्रासाठी धिक्याची घंटा असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, या संभाव्य टाळेबंदीला विरोध देखील होऊ लागला आहे. कामगार वर्गांचे हित पाहता लॉकडाऊन नको, उपचारावर अधिक भर द्या. स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनसारखे निर्णय सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी घेतले तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत रस्त्यावर राहू, असा इशारा माजी आमदार व माकपा नेते नसरय्या आडम यांनी दिला आहे.
सोलापूर शहर व जिल्हा आरोग्य विभागाने वाढत्या कोरोना रुग्णांचा उगीच बाऊ करू नये. शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचारावर अधिक भर द्यावे. गर्दी होऊ नये यासाठी उपाय योजावेत, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- खासदार जाधवांसह जिल्हाधिकारी, एसपींकडून शल्यचिकीत्सकाची कानउघडणी
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- मोठी बातमी : सरकारच ठरल ! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी होणार लॉकडाऊन ?


