जालना: राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्यातच काल जालन्यात एक नाट्यमय प्रकार घडलामुले सर्वत्र त्याची चर्चा होती. काल एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, आता पुढे काय करायचे ? असे प्रश्न संबंधीत रूग्णाला सतावू लागला. पॉझिटिव्ह म्हटले की, कुणी जवळ येईना, कुणी मार्गदर्शन करेना, अशा द्विधामनस्थितीत असलेल्या एका रूग्णाने थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पद्मजा सराफ यांचे दालन गाठल्याने मोठी खळबळ उडाली.
याविषयी अधिक माहिती अशी की, जिल्हा रूग्णालय परीसरात उभारण्यात आलेल्या आरटीपीसीआर लॅबजवळ स्वॅबचे नमुने घेतले जातात. त्यामुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेकजण या लॅबमध्ये येवून स्वॅब देतात, त्यांना त्यांचा रिपोर्ट मोबाईलवर संदेशाद्वारे पाठविण्यात येतो. अशाच एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा संदेश संबंधीत रूग्णाच्या मोबाईलवर आल्याने तो काहीसा घाबरला. आता काय करायचे, कुठे जायचे? असे प्रश्न त्याला सतावू लागले. कारण पॉझिटिव्ह रूग्णांबाबत तेथे कुठेही मार्गदर्शनाची सुविधा नव्हती.
रिपोर्ट एका ठिकाणी, सही एका ठिकाणी अन् शिक्का तिसऱ्या ठिकाणी अशी साखळी होती आणि आता तर जिल्हा रूग्णालय परीसरात केवळ गर्दीच असल्याने कुठेही ताळाला मेळ नव्हता. अशा परिस्थितीत संबंधीत रूग्णाला काय करावे आणि काय नाही? हे सूचत नव्हते. अखेर त्याने थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांचे दालन गाठले. विशेष म्हणजे त्याला कुणी अडवले देखील नाही. डॉ. सराफ यांना हकीकत कळाल्यानंतर त्यांनी त्याला एसआरपीएफमधील कोवीड सेंटरला पाठविले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही शेवटची वेळ आहे’ ; कोहलीवर इंग्लंडच्या फलंदाजाचा खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा आरोप
- ‘तिकडे कर्जबुडव्या उद्योगपतींना मोकळे सोडायचे आणि इकडे सामान्यजनांचे खिसे कापायचे’
- धक्कादायक! जावयाने कोयत्याने केला सासूचा खून
- पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह
- ‘व्याजदर कमी करण्याचा निर्णय नजरचुकीने जाहीर केला हा तर ‘धक्कादायक विनोद’ म्हणावा लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

