परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी पहाटे सारी वार्डातील रुग्णांच्या मृत्यू नंतर खासदार संजय (बंडू) जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकीत्सकांसह तेथील वैद्यकीय अधिकार्यांना धारेवर धरले.
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य उपसंचालकांशी थेट मोबाईलवरून जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली. खासदार जाधव, जिल्हाधिकारी मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुळीक, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, नानलपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रवीण धुमाळ आदींसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्याची उपस्थिती होती.
रुग्णालयातील सारी वार्डात शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी गोंधळ घातला. विशेष म्हणजे दोघांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जाब विचारताच तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकार्यांनी तेथून काढता पाय घेतला. भल्या पहाटे एकच्या सुमारास सारी वार्डातील रुग्ण दगावल्यानंतर तब्बल चार वाजेपर्यंत सारी वार्डाकडे कोणीही फिरकले नाही. वैद्यकीय अधिकार्यांनी दाखवलेल्या बेफिकीर वृत्तीचा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी साडेअकरा वाजता घेतलेल्या बैठकीतून समाचार देखील घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे ?
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

