Share

‘मोदी सरकारनेच परमबीरांना देशाबाहेर फरार होण्यास मदत केली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.

या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांना देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ‘टिव्ही ९’ सोबत संवाद साधताना ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या मदतीनेच त्यांना परदेशात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. हा आमचा आक्षेप असल्याची प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआए तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने परमबीर सिंह यांना अनेकेदा समन्स पाठवलेत. परंतू अद्याप एकही समन्स परमबीर सिंह यांच्या हाती पडलेले नाही. कारण ज्या पत्त्यावर समन्स पाठवण्यात आले आहे, त्या ठिकाणी परमबीर सिंह नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिंह अटकेच्या भितीने देश सोडून पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!