मुंबई : – कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई हे प्रमुख केंद्र असलेल्या चित्रपट व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत असलेला दुय्यम कलाकार , कामगार , श्रमिक , तंत्रज्ञ तसेच ऑर्केस्ट्रा असा मोठा वर्ग आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे.
हिंदी आणि मराठी चित्रपट , मालिका क्षेत्राच्या माध्यमातून शासनाला कररूपाने मोठे आर्थिक उत्पन्न मिळते , कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपट , मालिका उद्योगातील लाखो कुटुंबांना मोठा आर्थिक नुकसान झाले असून सर्वांचं उदरनिर्वाहाचे साधन गमावले आहे .
यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घेऊन चित्रपट , मालिका कल्याण निधीची स्थापना करावी आणि त्या माध्यमातून या क्षेत्राशी संबंधीत असणाऱ्या सर्व घटकांना उचित आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशन कडून करण्यात आली आहे . त्यासंदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळाने विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन देण्यात आले .
सदर निवेदनाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना चित्रपट उद्योग कल्याण निधी स्थापन करण्याबाबत विनंती पत्र पाठवले आहे यावेळी अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता , सरचिटणीस प्रसाद खामकर , उपाध्यक्ष ऍड. रवी जाधव व पदाधिकारी कुंदन पाटील उपस्थित होते.
असं तसं मरण्यापेक्षा मग खाऊन पिऊन मरा, उदयनराजेंचा हटके सल्ला !
हे अन्यायकारक वीजबिल सरकारने माफ करावे – हर्षवर्धन पाटील
मुंबापुरीत कोसळधार; आतापर्यंत १५६ मिलीमीटर पावसाची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

