Share

मुंबापुरीत कोसळधार; आतापर्यंत १५६ मिलीमीटर पावसाची नोंद

Published On: 

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. मुंबईकर कामासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र त्यातही अडचणी वाढतच आहेत. मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. विशेषत: सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस दुपारचे १२ वाजले तरी धो धो कोसळतच होता. या वेळेत पावसाने शहरासह उपनगरात आपला जोर कायम ठेवल्याने शुक्रवारी सकाळपर्यंत मुंबईत ५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ ते ९ या वेळेत दक्षिण मुंबईत कुलाबा, नरिमन पॉइंट येथे २५ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ९ ते १० या वेळेत मलबार हिल, मेमनवाडा, वरळी, दादर, भायखळा, हाजी अली, मुंबई सेंट्रल, धारावी, माटुंगा, कुर्ला, विलेपार्ले या बहुतांश ठिकाणी ४० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. सकाळी साडेदहा वाजता हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी मुंबईल पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. हा पाऊस कोसळत असतानाच दादर येथील हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे सखल भागात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. पूर्व उपनगरातही पवई, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका आणि पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली आणि गोरेगाव परिसरातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने मुसळधार हजेरी लावली.

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले कि, पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या २४ तासांत पाऊस आणखी वाढेल. परिणामी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी रहावे, सुरक्षित रहावे’.

सॅनिटायझर तुटवडा भासताच एम्समधील डॉक्टरांनी लढवली शक्कल, स्वतःच तयार केलं सॅनिटायझर

नाशिक जिल्ह्यातील ११ धरणांचा पाणी साठा १०० टक्क्यावर

नगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!