Share

हे अन्यायकारक वीजबिल सरकारने माफ करावे – हर्षवर्धन पाटील

Published On: 

पुणे : शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक वीज बिलामध्ये वाढ केलेली आहे , याला भाजपचा विरोध आहे ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घेऊन लोकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावी अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे

मानलं तुम्हाला; रितेश व जेनेलिया देशमुखनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

केंद्र सरकार पॅकेज देत असेल तर राज्य सरकारने एक नया पैसा जनतेला दिला नाही म्हणून सरकारने हे वीज बिल माफ करावे असेही ते पुढे म्हणाले. जून महिन्यामध्ये राज्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना ज्या पद्धतीने वाढीव बिलाची आकारणी करून वाटप करण्यात आले त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने आज पुण्यातील रास्ता पेठ येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनी समोर आंदोलन करण्यात आले .

तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, बच्चू कडूंचे सक्त आदेश

या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि वाढीव वीज आकारणी बिलाची होळी करून निषेध केला यावेळी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील माजी राज्यमंत्री संजय भेगडे दौंडचे आमदार राहुल कुल आमदार भीमराव तापकीर पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!