🕒 1 min read
नवी दिल्ली: सध्या देशभरात निवडणुकांचे (Elections) वारे वाहत आहे. या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय नेते सभा तसेच विविध ठिकाणी रॅली इत्यादींचे आयोजन करताना दिसत आहेत. त्याच सोबत आरोप-प्रत्यारोप देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरूच आहेत. मात्र आता देशातील पाच राज्यांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये मतदार याद्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष निवडणुकीच्या तारखांकडे लागले आहे. गुरूवारी निवडणूक आयोगाने या पाच राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता.
बैठकी दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) आणि अन्य आरोग्य क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने गृह सचिव अजय भल्ला (Ajay Bhalla) यांच्याबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आता निवडणुकांच्या तारखा येत्या दोन दिवसात निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला, म्हणाले…
- सुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…
- अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस; म्हणाल्या,‘आता कोर्टात जाऊन साफ करावी…’
- ज्या देशात देवी म्हणून महिलांची पूजा केली जाते त्याच देशात मुस्लिम महिलांना…
- खुशखबर; मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता औरंगाबादेतही धावणार मेट्रो..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
