Share

ते प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत; विजयानंतर बावनकुळेंचे शरसंधान

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्रातील 6 विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकीपैकी 4 ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, नागपूर आणि अकोला या ठिकाणी एकमत होऊ न शकल्यामुळे तिथे निवडणूक झाली. विधानपरिषदेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. नागपूर (Nagpur) विधानपरिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे विजयी झाले आहेत.

काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा दिला होता. देशमुख यांचा पराभव करत बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर सडकून टीका केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यपदासाठी कसे पात्र नाहीत हे सांगितले आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीमुळेच काँग्रेसला मते मिळाली असून काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटली आहेत. 318 मते भाजप आणि सहयोगी पक्षांकडे होती. 240 मते महाविकास आघाडीकडे होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 186 मते मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे तेवढी तरी मत त्यांना मिळाली. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हुकुमशाही भूमिका, दोन मंत्र्यांच्या दबावाखाली पक्षाला वेठीस धरणे यामुळे काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते, मतदार अस्वस्थ होते. हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचे हे परिणाम आहेत. यात त्यांनी आत्मचिंतन करायला हवे की आपली मते का फुटली, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

2 दिवस त्यांनी घोडेबाजार केला, तरी त्यांना पक्ष एकत्र ठेवता आला नाही. हा खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव आहे. त्यांचे कार्यकर्ते इमानदारीने काम करण्यासाठी तयार होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांनी हतबल प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!