Share

“नाना पटोलेंना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवायला हवं”, चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. काँग्रेसचे नेते किती खालच्या थराला गेले आहेत हे लोकांपर्यंत नेण्यासाठी पटोले यांच्या विरोधात भाजप महाराष्ट्रभर निदर्शनं करणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना म्हणाले, ‘नाना पटोले यांच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम असावा. त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवायला हवं. त्यांची मानसिक आणि शारीरिक तपासणी करायला हवी. ‘पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेनंतर पटोले त्यास नौटंकी म्हणाले होते.

हा अमित शहांचा प्लान होता असेही नाना पटोले म्हणाले होते. मग त्यांनी मोदींना मारण्याची भाषा केली. त्यावरून टीका होताच मी गावगुंडाबद्दल तसं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. आता पुन्हा तसंच बोलतायत. त्यांना नेमकं काय म्हणायचंय? पंतप्रधान पदावरील एखाद्या व्यक्तीबद्दल असं बोलून प्रसिद्धी मिळविण्याचं त्यांच्या पक्षाचं धोरण ते राबवत आहेत का?,’ असा सवाल पाटील यांनी केला. ‘आम्ही पटोले यांचा निषेध करतो. राजकारणाचा स्तर किती घसरलाय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!