Share

‘कॉंग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होत होती. या भेटीमुळे देशातील राजकारणाचे समीकरणे बदलतील, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेस वगळून भाजप विरोधी स्थानिक पक्ष तयार करण्यात येणार आहे का, असा प्रश्न विचारला असता, जे लढतात असा एक शक्तीशाली पर्याय असला पाहिजे. जर कुणी लढत नसेल तर आम्ही काय करायचं, असा प्रतिप्रश्न ममता बॅनर्जी यांनी केला. त्यामुळे कॉंग्रेस बाबत शंका उपस्थित होत आहे. दरम्यान या ममता बॅनर्जी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या मात्र कॉंग्रेसच्या कुठल्याच नेत्याशी संवाद साधला नाही.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कॉंग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय असल्याचे म्हणले आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!