मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी सचिन वाझे (Sachin Vaze)ची उलट तपासणी घेतली आहे. आजच्या उलट तपासणी देखील सचिन वाझे याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यात सर्वात महत्त्वाचे उत्तर होते ते म्हणजे अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत काहीच आठवत नाही, अशी साक्ष सचिन वाझेने दिली आहे. आज दुपारी चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगात (Chandiwal Commission) आजही सचिन वाझे याची उलट तपासणी केली आहे.
सचिन वाझेला उलट तपासणी करता बोलावलं गेलं आणि देशमुख यांच्या वकील अनिता यांनी सचिन वाझेला प्रश्न विचारले. पण सचिन वाझे यांनी उत्तर देण्याआधीच अनिल देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करत सचिन वाझे आणि परमबीर सिंग या दोघांची 2 दिवसापूर्वी झालेली तासाभराची भेट याबाबत झालेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली.
ती कोणत्याही प्रकारची ग्रुपची बैठक नव्हती असं सांगून प्रसारमाध्यमांनी केलेल्या वर्तन कारणामुळे परमबीर सिंग यांना त्रास होत आहे, असं आयोगाला सांगितलं. मात्र याच वेळेस स्वतः सचिन वाझे यांनीच या अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या नाराजीला उत्तर देच प्रसारमाध्यम त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि जे घडलं ते त्यांनी लिहिलं असं सांगितलं.
दरम्यान, न्यायालयीन चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करत ही खुली चौकशी आहे यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडलं ते सांगितलं गेलं ते लिहिलं गेलं असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि पुन्हा सचिन वाझेच्या उलट तपासणीला सुरुवात करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो’
- …मग 5 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन हा काय लोकशाहीचा विजय का?- सदाभाऊ खोत
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’
- ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’


