Share

Gujarat Election Result । रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा आघाडीवर; काय आहे स्टेटस?

Published On: 

Gujarat Election Result । जामनगर :  गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसोबतच इतर राज्यांतील सहा विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालात भाजपला बहुमत मिळाले आहे. हिमाचलमध्येही आधी भाजपला बहुमत मिळाले होते, पण नंतर काँग्रेसने भाजपला मागे पाडले आणि काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

मतांची आकडेवारी पाहता गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. सध्याच्या निकालानुसार भाजपा 149 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 20 आणि आम आदमी पार्टी 8 जागांवर आघाडीवर आहे.

गुजरातच्या या निवडणुकीत जामनगर उत्तरच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण इथून भाजपाने प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबाच्या प्रचारासाठी स्वत: रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात उतरला होता.

सध्याची आकडेवारी पाहायला गेलं तर रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) 12 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे रिवाबा यांना जामनगर उत्तरमधून मोठा विजय मिळवण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!