🕒 1 min read
Gujarat Election Result | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसोबतच इतर राज्यांतील सहा विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालात भाजपला बहुमत मिळाले आहे. हिमाचलमध्येही आधी भाजपला बहुमत मिळाले होते, पण नंतर काँग्रेसने भाजपला मागे पाडले आणि काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. गुजरातमध्ये भाजपने विक्रमी बहुमताकडे वाटचाल केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळी 11.00 वाजेपर्यंत गुजरातमध्ये भाजप 151, काँग्रेस 19 आणि आम आदमी पार्टी 8 जागांवर आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने 36 जागांवर तर भाजपने 28 जागांवर आघाडी घेतली आहे.
“कॉंग्रेस आणि आप यांच्यात मतांची विभागणी झाली आहे. त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये यश मिळण्यामध्ये झाला. हिमाचल प्रदेशमध्ये परिस्थिती वेगळी आहे. तिथे काँग्रेस भाजपापेक्षा पुढे आहे”, असे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील माध्यमांशी बोलताना सांगितले.
2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sara Ali Khan | ‘लाईफ इन मेट्रो’च्या सिक्वेलमध्ये सारा अली खान आणि ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
- Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर! काँग्रेस आघाडीवर
- Amol Mitkari | “विजय शिवतारे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये…”; अमोल मिटकरींचा घणाघात
- Tecno Pova 4 | उत्कृष्ट फीचर्ससह लाँच झाला टेक्नोचा Tecno Pova 4 मोबाईल
- Amol Mitkari | “सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”; सीमाप्रश्नावरून अमोल मिटकरींचा शिंदे गटावर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
