पिंपरी : कोरोना रोगाने राज्यात शिरकाव केल्यापासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात थैमान घातले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ होत आहे. अशात अनेक गरीब नागरिक फेखील या रोगाने ग्रस्त होत असून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जिल्ह्यासह अनेक भागातुन या ठिकाणी दाखल होतात.
वर्षभर देखील इतर आजारांमुळे शेकडो रुग्ण या रुग्णालयात दाखल होत असतात. गावभागातून येणाऱ्या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होतात. यामुळेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर भोजन सुविधा पुरवण्यात येत असून या उपक्रमाला ‘नमो थाळी’ असे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वायसीएममधील रुग्णांच्या नातेवाईकांना २० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या थळींचा शुभारंभवेळी भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवी अनासपुरे, अमित गोरखे, मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- कांद्यासाठी आंदोलन करणारे, मागील सहा महिन्यांपासून शेतकरी संकटात असताना कुठे होते?- राधाकृष्ण विखे
- कोरोनाची दाहकता सांगताना या अधिकाऱ्याला अश्रू झाले अनावर
- या बोललीवूड स्टारसह दिग्दर्शकांना कोर्टाचा समन्स तर सलमानला…
- ‘या’ ट्विट नंतर पूजा भट्ट सोशल मिडीयावर झाली भलतीच ट्रोल…
- पदवी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांस नोकरी नाकारणाऱ्यांवर होणार कारवाई; मंत्री उदय सामंतांनी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

