Share

माजलगाव धरणाला ‘सुंदर सागर’ नाव द्या; मंत्री जयंत पाटलांना राष्ट्रवादीचे साकडे

Published On: 

बीड : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे मराठवाड्याच्या विकासासाठी अमूल्य योगदान राहिलेले आहे. त्यांच्या कार्याची युवा पिढीला जाणीव व्हावी म्हणून माजलगाव धरणाला लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या नावावरून ‘सुंदर सागर’ असे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठवले आहे.

सुंदरराव सोळंके यांनी १९८० मध्ये सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यांमुळे माजलगाव येथे धरणाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो एक्कर जमीन ओलिताखाली येवून सिंचनक्षेत्र वाढले. मराठवाड्यातील शेतकरी समृद्ध करण्याचे कार्य लोकनेते सुंदरराव सोळंकेंच्या हातून घडलेले आहे. त्यांच्या पाठपुराव्यांमुळे जायकवाडी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील माजलगाव धरणाच्या उभारणीतून पूर्ण झालेले आहे.

मांजरा, कुंडलिका, सरस्वती यासारखे मध्यम व लघु प्रकल्प सोळंके यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात पाठपुराव्यांमुळे झालेले आहेत. सिंचन प्रकल्पातील सोळंकेंच्या योगदानाची माहिती भविष्यात युवा पिढीला व्हावी यासाठी लोकनेते स्व. सुंदरराव सोळंके यांच्या नावावरून माजलगाव धरणाला ‘सुंदर सागर’ असे नाव देवून शासकीय अभिलेखात नोंद घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे दराडे यांनी केली असून निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सादर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!