नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४१,१३४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,८९,२६,०००/- चा दंड वसूल केला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.
सोमवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे नेहरुनगर झोन अंतर्गत ६, गांधीबाग झोन अंतर्गत १३, लकडगंज झोन अंतर्गत १, आशीनगर झोन अंतर्गत ५ आणि मंगलवारी झोन अंतर्गत २ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३५,६६४ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ७८ लाख ३२ हजार वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोन मधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा द्वारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली दिसते?’; भाजपाचा खोचक सवाल
- UPSC च्या परीक्षेतील लातूर जिल्हयातील सहा जणांचे यश अनेक युवकांना प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी


