मुंबई : मुंबईतील ड्रग्ज प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या आग्रलेखातून भाजपवर आज पुन्हा निशाना साधला आहे. स्वतःच्या पार्श्वभागाचा कंडू शमविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा असा वारक धिक्कारार्ह आहे. राज्यांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर हे आक्रमण आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, एनसीबीचे अधिकारी राज्यात येऊन खोटी प्रकरणे करतात, लाचखोरी करतात व त्यांना जाब विचारणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे लोक देशद्रोही, असहिष्णू ठरवतात. हा नादानपणा आहे. खोटी प्रकरणे करून काळा पैसा व प्रसिद्धी दोन्ही मिळवायचे असा हा जोडधंदा सुरू झाला आहे. असे संजय राऊतांनी लिहीले. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
भातखळकर ट्विट करत लिहीतात, ‘शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली दिसते?, ड्रग्ज माफियांकडून वसूली करणारा वाझे कोण?’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली दिसते?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 26, 2021
ड्रग्ज माफियांकडून वसूली
करणारा वाझे कोण?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 26, 2021
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील आग्रलेखातून केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर ड्रग्ज प्रकरणावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, आता या आर्यन प्रकरणातला धक्कादायक खुलासा झाला आहे. आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी मध्यस्थांमार्फत झाली. त्यातली मोठी म्हणजे ८ कोटी रुपये इतकी रक्कम अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होती. त्यातली काही रक्कम इकडे तिकडे कशी फिरवण्यात आली हे या संपूर्ण प्रकरणातील एक पंच प्रभाकर याने समोर येऊन सांगितले. या प्रकरणातला एक साक्षीदार किरण गोसावी हा आधीच बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाला की त्यास बेपत्ता केला, याचा तपास कोणी करायचा? केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखाच नव्हे तर संपूर्ण चेहराच या प्रकरणी ओरबाडून निघाला आहे.
प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे. आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार?, असाही सवाल आजच्या अग्रलेखातून राऊतांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेल ५ रुपयांपेक्षाही जास्त दराने महागले
- जे गेले त्यांच्याबाबत अश्रू ढाळून काही अर्थ नाही – जयंत पाटील

