🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते .चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत ति आणि प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरला पाहायला मिळत आहे.
तो फोटो अगदी मजेशीर आहे. आणि या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्सप्रेशन… शुटिंग करताना आम्ही नेहमीच धमाल मस्ती करतो त्यावेळी तू पण तू काढलेले फोटो पाहायला मला नेहमीच आवडतात असे तिने आवर्जून फोटोग्राफर तेजस नेरुरकरला सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत भारताचा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात प्रवेश
- भारत-इंग्लड चौथा टी-२० आज; मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
- सिल्लोड नगर परिषदेत समाज सेविकेसह अन्य लोकांचा राडा
- करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट
- संजय राऊतांच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
