Share

रोहित पाटलांनी विरोधकांना पाजलं पाणी! चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या, “आज आबा असते तर…”

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावं लागलं.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रोहित पाटलांचे अभिनंदन केले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “रोहीत तुझं खूप अभिनंदन! कोणतं पद असो की नसो, आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्याचं फळ तुला आज मिळालंय. हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता.”

रोहित पाटील (Rohit Patil) यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांनी दिलेला इशारा आता निवडणुकीच्या निकालात सत्यात उतरवला. विरोधकांना खरोखरच आबांची म्हणजेच आरआर पाटील (R.R. Patil) यांची रोहित पाटील यांनी आठवण करून दिली आहे.

या निवडणुकीच्या विजयानंतर आणि कवठेमहंकाळ नगरपंचयातीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर रोहित पाटील यांना त्यांचे वडील आर आर पाटील यांची आठवण आली. रोहित पाटील म्हणाले की, आबांची आठवण येत आहे. त्यांचं स्वप्नं होतं की कवठेमहंकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता स्थापन व्हावी आणि आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली असून आबांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!