अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नगर-मनमाड महामार्ग केंद्र सरकारने ताब्यात घ्यावा, व या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे व तयार झालेला मजबूत रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, रस्त्याची झालेली चाळण पाहून माजी खासदार प्रसाद तनपुरे व्यथित झाले. त्यांनी थेट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना रस्ता दुरुस्तीबाबत साकडे घातले आहे.
माजी खा.तनपुरे यांनी पत्रात म्हटले आहे की, नगर-मनमाड हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राज्य शासनाने ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपये जरी दिले असले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नसून हा सर्व खर्च पाण्यात जाण्याचा धोका आहे. नगरहून शिर्डीकडे जाणारा हा रस्ता आहे. त्यामुळे साई भक्तांची रस्त्यावर कायमच वर्दळ असते. शिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेशातून येणाऱ्या हजारो ट्रक रोज या रस्त्यावरून उत्तर भारतात जातात. हा रस्ता चाैपदरीकरण व्हावा, सिमेंट काॅंक्रेटचा व्हावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. त्यामुळे नगर-मनमाड महामार्ग कॉंक्रिटीकरण करून लवकरात लवकर मजबूत बनवावा अशी मागणी माजी खा.तनपुरे यांनी केली आहे.
हा महामार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा एकमेव जवळचा मार्ग आहे. राज्य सरकारने २००० साली ह्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण केले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षात त्याची केवळ डागडुजी झाली. हजारो वाहने धावत असल्याने रस्त्याची लगेचच चाळण होते. परिणामी टायर फुटणे, अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा महामार्ग केंद्र सरकारने कॉंक्रिटीकरण करून मजबूत बनवावा यासाठी प्रसाद तनपुरे यांनी गडकरी यांना साकडे घातले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कोरोना रोखण्यात सरकारची आरोग्य यंत्रणा अपयशी, प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप
- ड्रग्स प्रकरण बॉलीवूड कडून क्रिकेटकडे ? शाहरुख खानच्या टीम वर आरोप…
- कंगनाच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…
- भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत – विनोद तावडे
- ‘बिग बॉस’ १४ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

